
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावातील शेतकरी शेतात काम करीत असताना साप चावल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविंद्र कांबळे (वय 38) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात बटाटे लागवडीचे काम करीत असताना बटाट्याच्या वेली खाली साप आढळला. वेल उचलत असताना सापाने रविंद्र यांच्या हाताला दोनवेळा दंश केला. उपचारासाठी त्याला बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले परंतु वाटेतच रविंद्र कांबळे यांचा मृत्यू झाला. रविंद्र कांबळे यांच्या निधनाने बेळवट्टी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta