
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.
शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुण्या आरोग्य भारतीच्या उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत मानवी रेवणकर अवनी पावसकर यांनी केले,
प्रारंभी शालेय विद्यार्थी सहाना हिने योगाचे महत्त्व सांगितले, योगागीत श्राव्या भट्ट भगवतगीता इंद्रजीत अमोल कुडची यांने सादर केले तर योग शिक्षिका हेमा आंबेवाडीकर यांनी योगाची महत्त्व सांगून विद्यार्थी पवन मठद व श्रीनिधी सुतार यांच्यासमवेत सूर्यनमस्कार योगाची प्रात्यक्षिके सादर करून मुलांच्याकडे करून घेतली. याप्रसंगी श्रद्धा मेंडके, धनश्री सावंत, मोनाली काळे, किरण पावसकर, गायत्री शेंद्रे, रूपा कुमठाकर, रूपाली जोशी, सुजाता पाटील, पौर्णिमा, प्रेमा मेलीनमनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानवी रेवणकर हिने केले तर चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta