Sunday , July 26 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरच्या’ प्रशासक श्रीमती प्रियदर्शनी खटाव लाभल्या होत्या तर व्यासपीठावर डॉ. आसिफ कारीगर आणि कार्यक्रमाच्या कोऑर्डीनेटर सौ. शितल कामठे उपस्थित होत्या.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी शिंपून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नंतर श्रीमती प्रियदर्शनी खटाव यांनी योगसाधनेचे महत्व आणि त्याची पद्धत याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं. सर्व सहभागी विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यान याची प्रात्यक्षिकं केलीत. संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना, कॉलेजचे प्राचार्य, डॉ. विष्णू कंग्राळकर यांची होती.
आजच्या या योग दिनाचे औचित्य साधून आरोग्यप्रद जीवनशैलीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास बेटगेरी यांनी केलं. पाहुण्यांची ओळख सर्वेश यांनी केली तर शेवटी कु. सिमरन सुंठनकर यांनी आभार मानले..

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *