Sunday , September 20 2026
Breaking News

श्री चांगळेश्वरी हायस्कूल व प्रायमरी शाळा येळ्ळूर येथे जागतिक योग दिन संपन्न…

Spread the love

 

येळ्ळूर : आपल्या आरोग्यावरचा खर्च टाळण्यासाठी योगा हा मोफत उपचार आहे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सदृढ राखणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्वांनी दररोज योगा, प्राणायाम करावा असे मौलिक सल्ला शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले.

यावेळी प्रायमरी मुख्याध्यापक आय. बी. राऊत, श्री. नरेंद्र मजूकर, श्री. बोकडेकर यांनीही विद्यार्थ्यांना योगाबद्दल माहिती सांगितली.
यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. एम. एम. डोंबले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम तसेच पिरॅमिडचे सादरीकरण केले. यामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. बी. कांबळे यांनी तर आभार एम. एम. डोंबले यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *