
बेळगाव : बेळगाव येथील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या सहकार्याने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) आणि अन्य संघटनांतर्फे 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी दिनानिमित्त आज गुरुवारी सकाळी आयोजित जनजागृती रॅली उस्फूर्त प्रतिसादात पार पडली.

शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून सदर अंमली पदार्थ सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्यासह जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल, सरचिटणीस अभय आदीमनी, बेळगाव शहर केमिस्ट आणि ड्रगिस्ट्स असोसिएशन वगैरे विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राणी चन्नम्मा सर्कल येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, कोल्हापूर सर्कल मार्गे केएलई शताब्दी केंद्राजवळ सदर जनजागृती रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये विविध संघटनांच्या सदस्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनींचा देखील सहभाग होता.

Belgaum Varta Belgaum Varta