Saturday , March 7 2026
Breaking News

तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांच्याशी रमाकांत कोंडूसकर यांनी केली सीमाप्रश्नासंदर्भात चर्चा

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय खासदार श्री. धैर्यशील माने यांची म. एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी आज दि. 4 जुलै रोजी कोल्हापूर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोंडूसकर यांनी माने यांचा सत्कार केला. व सीमाप्रश्नी चर्चा केली.

ह्या भेटीदरम्यान येणाऱ्या काळात लवकरात लवकर तज्ञ समितीची बैठक लावून व या अधिवेशनाच्या काळात सीमाप्रश्न विषयी नक्कीच विषय मांडू. वैद्यकीय शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात सुद्धा आपण सीमाभागातल्या अजून चांगल्यारीतीने सेवा पोहचवू व सीमा भागातल्या जनतेच्या तळागाळात पोहचवून होणारा अन्याय थांबू. दोन दिवसापूर्वी राज्यसभा सदस्यांनी सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे असं वक्तव्य केले त्यामुळे समस्त सीमा भागातल्या जनतेचा अपमान केला. त्याबद्दल चर्चा करण्यात आली व याविषयी आपण संसदेत नक्की आवाज उठवू असे आश्वासन तज्ञ समितीचे अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *