बेळगाव : महालक्ष्मी नगरगणेशपूर येथील पाईपलाईन रोड रस्ता 60 फूट करण्यात यावा यासाठी गणेशपूर आणि परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याच्या कामला सुरूवात झाली आहे. पाईपलाईन रोड पासून पुढे लक्ष्मी नगर, सैनिक नगर, सरस्वती नगर, आर्मी क्वार्टर, शिवनेरी कॉलनी, केएचबी कॉलनी आदी वसाहती आहेत. या वासहतींकडे जाण्यासाठी पाईपलाईन रोड हा एकमेव मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रास्ता अरुंद झाला आहे त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा रस्ता 60 फूट करण्यात यावा यासाठी या परिसरातील नागरिकांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार मागील 15 दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरवात झाली आहे. मात्र काही समाजकंटकांनी रस्त्याच्या विकास कामात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने कंत्राटदारांवर अरेरावी करत आहेत. तर काहीनी रस्ता अतिक्रमण करून पुन्हा रस्त्यातच खांब घालून आपली हद्द निर्माण केली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण हटवून सदर रस्ता 60 फूट करण्यात यावा यासाठी येथील नागरिकांनी आंदोलन छेडले आहे. तसेच एक निवेदन आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आणि भर रस्त्यातच ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी अरविंद कापडिया, लुईस रोड्रिक्स, अर्जुन बिलावर, सदानंद गावडे, विश्राम गावडे, विल्सन आदींसह 200 हुन अधिक आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …