खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सातबारा उतारा, उत्पन दाखला, जाती दाखला आदी कागदपत्रासाठी खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तहसील कार्यालयात तिकीटाला पैसे खर्च करून तसेच वेळ खर्च करून कागदाची जमवाजमव करताना त्रास सहन करावे लागत होते. मात्र आता कर्नाटक सरकारने खेड्यातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क महसूल खात्याचे अधिकारी खेड्यात जाऊन घरोघरी ग्रामस्थांना सातबारा उतारा, जाती दाखला, उत्पन्नाचा दाखला व इतर कागद पत्रकाचे वितरण करण्याचा उपक्रम शनिवारी दि. १२ रोजी सुरू केला.
यावेळी उपतहसीदार, सर्कल, तलाठी आदीची उपस्थिती होती.
याचा शुभारंभ लिंगनमठ (ता. खानापूर) येथे शनिवारी दि. १२ रोजी महसूल खात्याचे अधिकारी चिदानंद भोनसगी, सर्कल श्री. सिमाणी, तलाठी श्री. मंजुनाथ तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खेडेगावात जाऊन या उपक्रमाची माहिती नागरिकांना देण्यात आली. नागरिकांच्या तिकिट खर्चाला, वेळ, शारीरिक त्रासाची बचत झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेतून समाधान पसरले आहे.
मात्र हा उपक्रम कायम स्वरूपी चालु ठेवावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
Check Also
खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
Spread the love खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा …