
बेळगाव : रक्तकर्करोगाशी झुंजणाऱ्या १० वर्षीय आराध्या कृष्णा पार्लेकर हिच्या मदतीसाठी ‘यंग बेळगाव फाउंडेशन’ पुढे सरसावले आहे. फाउंडेशनच्या सदस्यांनी आराध्याच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करत समाजालाही मदतीसाठी आवाहन केले आहे.
‘यंग बेळगाव फाउंडेशन’ने ‘टी-सेल ॲक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’ नावाच्या एका दुर्मीळ आणि गंभीर रक्तकर्करोगाशी धैर्याने लढा देणाऱ्या १० वर्षीय आराध्या कृष्णा पार्लेकर हिला आर्थिक मदत केली आहे. आराध्याच्या उपचारासाठी सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामुळे तिच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे.
आराध्या सध्या बेळगावातील के.एल.ई. डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तिच्या उपचारासाठी ८ ते ९ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, यामुळे तिच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडला आहे. ही माहिती मिळताच ‘यंग बेळगाव फाउंडेशन’च्या सदस्यांनी आराध्याच्या वडील आणि मामांना धनादेश सुपूर्द केला. या प्रसंगी फाउंडेशनचे सदस्य ओमी कांबळे, अद्वैत चव्हाण पाटील, अनिकेत आनंद राव पाटील, ज्ञानेश्वर राजू अणबार आणि इतर उपस्थित होते.युवा नेते आणि फाउंडेशनचे अध्यक्ष ऍलन विजय मोरे यांनी सांगितले की, आराध्याच्या उपचारासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी बेळगावातील के.एल.ई. डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाशी संपर्क साधावा.

Belgaum Varta Belgaum Varta