अथणी : केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यातील मुरगुंडी गावात घडली. तर उर्वरितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्वजण कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन परत जात असताना मुरगुंडीजवळ हा अपघात झाला. बस आणि कारमध्ये झालेल्या या जोरदार धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात कोल्हापूरहून अफजलपूरला जाणाऱ्या कारमधील चौघांपैकी तिघा जणांचा मृत्यू झाला. तर अथणीहून मिरजला जाणाऱ्या केएसआरटीसी बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. राहुल, गिरीश आणि सांगू तिघेही (रा. अफजलपूर जि. कलबुर्गी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर जखमींना पुढील उपचारासाठी अथणी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद अथणी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta