
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग ४ वर रविवारी अपघाताची मालिका घडली.
एका ट्रकने दुचाकीस्वार असलेल्या दोन जणांना चिरडल्याने झालेल्या अपघाताच्या तीव्रतेमुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन ट्रक, एक कार आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला. हुबळी येथील रहिवासी शिवप्पा शहापूर आणि नंदगड येथील रहिवासी रफिक जांबोटी यांचा मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
Belgaum Varta Belgaum Varta