
बेळगाव : घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट हिंदवाडी आणि बी. के. बांडगी ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव तालुक्यातील मराठी माध्यमाच्या हायस्कूलमधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीना रोख रकमेचा पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्याचा कार्यक्रम रविवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वा निश्चित केला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभय पाटील ठाणे प्रमुख वक्ते म्हणून श्री. शामराव पाटील, निवृत मुख्याध्यापक, रयत शिक्षण संस्था, वाई यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
ज्या शाळांच्या विद्यार्थिनीने आपले अर्ज दिले आहेत त्यांनी आपल्या पालकासमवेत रविवारी सकाळी साडेदहा वाजता घुमटमाळ मारुती मंदिर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta