Saturday , December 13 2025
Breaking News

चिटफंड व्यवहारातून “त्या” तिघांची आत्महत्या; सोसाइड नोट हस्तगत!

Spread the love

 

बेळगाव : शहापूर जोशीमळा परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून, एका महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्या चिटफंड व्यवहारातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान मृत संतोष कुराडेकर यांच्याकडून एक सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली. मिळालेल्या सुसाइड नोटनुसार, संतोष कुराडेकर हा गेल्या २५ वर्षांपासून जोशीमळा परिसरात वास्तव्यास होता. त्यांनी अनेकांना चिटफंड व्यवहारात गुंतवले होते. त्यांनी अनेकांकडून पैसेही उचलले होते, परतफेड वेळेत शक्य झाली नव्हती. विशेष म्हणजे वडगावच्या राजू कुडतरकर या सोनाराकडे ५०० ग्रॅम सोने दिले होते. मात्र सोनाराने सोने परत देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. विशेष म्हणजे संतोष कुराडेकर गाव सोडून पळून गेल्याची अफवा देखील पसरवली होती. अशा मानसिक त्रासाला कंटाळूनच आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. राजू कुडतरकरकडून सोने वसूल करून संबंधित लोकांना परत द्यावे असाही मजकूर सोसाइड नोटमध्ये नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी शहापूर निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार

Spread the love  बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *