
बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक प्राथमिक मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 223 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 173 गुणासह उपविजेते तर शिंदोळीच्या देवेंद्र जीनगौडा शाळेने 115 गुणासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. प्राथमिक गटात महमंद फरान नदाफ संत मीरा, तनुजा जाधव शांतिनिकेतन स्कूल खानापूर, माध्यमिक गटात भावना बेर्डे व दीपा बिडी संत मीरा, तर मुलांच्या गटात सुहर्ष कुंभार देवेंद्र जिनगौडा, अनिकेत कुंभार शांतिनिकेतन स्कूल यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा गणेशपुर शाळेचे सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, श्वेता पाटील आशा भुजबळ श्रीकांत कांबळे, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या वैयक्तिक विजेत्या खेळाडूंना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आशा भुजबळ, तनुजा गावडा, माधवी हरेर, विद्या कम्मार, वैशाली कडेली, सही केरेकर, स्नेहा दळवी, जयश्री दळवी, रोहिणी पाटील, विद्या मगदूम, अनिता नाईक, मंजुनाथ भुजंगण्णावर, अमृता चिदगी, शिवकुमार सुतार, यश पाटील, अभिषेक गिरिगौडर, सिद्धांत वर्मा, ओमकार गावडे प्रशांत वांडकर, गंगा, स्वाती सावंत, जयसिंग धनाजी, बापू देसाई, मॅथ्यू लोबो, हर्ष रेडेकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta