Wednesday , March 4 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मूर्तिकारांच्या कामाला वेग

Spread the love

 

बेळगाव : 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेश भक्त आतुरला आहे. मूर्तिकार देखील गणेश भक्तांच्या मागणीनुसार मनमोहक मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी दिवस-रात्र काम करीत आहेत. यावर्षी 27 ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून मूर्ती वेळेत पूर्ण करण्याची लगबग मूर्तिकार करताना पाहायला मिळत आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासूनच गणपती मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात होते. शाडू पासून तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणपती मूर्ती घडविल्या जातात. अलीकडच्या काळात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची विशेष मागणी वाढली आहे. मूर्तिकार देखील मागणीनुसार पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यावर भर देत आहेत. बेळगावसह परिसरात विविध प्रकारच्या आकर्षक घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांचा कल असतो. शाडू माती तसेच पीओपी पासून विविध आकर्षक मुर्त्या तयार करण्यात येतात. सध्या कच्चामाल महाग झाल्याने मूर्ती दरात काहीशी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे गणेश मूर्तीवरील सजावटीचे स्वरूप देखील बदलले आहे. पूर्वी शाडू मूर्तीवर आकर्षक रंगकाम केले जायचे मात्र सध्या कुंदन मोती फेटा त्याचप्रमाणे गणरायाच्या पोशाखाचे क्रेझ वाढले आहे. आपल्या आराध्य दैवताच्या स्वरूपातील गणेश मूर्तीची मागणी जोर वाढली आहे. बदलत्या काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरूप देखील बदलले आहे. पूर्वी गणेशोत्सव श्रद्धेने भक्ती भावाने साजरा केला जायचा मात्र अलीकडे गणेशोत्सवात चढाओढ स्पर्धा पहावयास मिळत आहे. गणेशोत्सव घरगुती असो की सार्वजनिक गणेश भक्तांमध्ये स्पर्धात्मक भावना जास्त दिसून येत आहे. अलीकडच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन सोहळ्याचा नवा ट्रेंड पहावयास मिळत आहे. गणेश भक्तांच्या मागणीनुसार मूर्ती घडविल्या जातात मूर्तिकार सहा इंच मूर्ती पासून ते 21 फुटी गणपती मूर्ती तयार करत आहेत. हल्ली वर्षभर मूर्ती घडविण्याचे काम सुरू असते शेवटच्या टप्प्यात रंगरंगोटी व कलाकुसर करून गणपती मूर्ती आकर्षक बनविण्याचे काम सुरू आहे. बदलत्या काळात मूर्तींच्या मागणीत अनेक बदल झाले आहेत. सामाजिक माध्यमातून दाखविण्यात येणाऱ्या मूर्तींकडे ग्राहकांचा ओढा वाढलेला पहावयास मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप बदलते की काय अशी भीती देखील जुने जाणते लोक व्यक्त करीत आहेत. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे मूर्तिकारांच्या कामाचा जोर देखील वाढला आहे. मूर्तींची वाहतूक त्यांची योग्य प्रकारे पॅकिंग त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेत भक्तांपर्यंत मूर्ती पोहोचवणे ही जबाबदारी मूर्ती करायची असते त्यामुळे मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे. वाढत्या महागाईचा त्याचप्रमाणे कुशल कामगारांचा उपलब्धतेचा सामना करावा लागतो. या सगळ्या परिस्थितीचा सामना करत मूर्तिकारानी वर्षभर घेतलेल्या परिश्रमातून लाडक्या गणरायाची आकर्षक मूर्ती बनते व भक्तांना गणेशोत्सवाचा खराखुरा आनंद अनुभवता येतो.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *