Monday , December 15 2025
Breaking News

पाटील गल्ली येथील गणेश मंडळाचा “मराठी” फलक पुन्हा उभारला; मध्यवर्ती सार्व. गणेशोत्सव महामंडळाचा दणका!

Spread the love

 

बेळगाव : महापालिका प्रशासनाने काल पाटील गल्ली येथे लावलेला मराठी फलक हटवल्याने मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाने जोरदार आवाज उठवताच खाली उतरवण्यात आलेला फलक आज शनिवारी पुन्हा पूर्वीच्या जागी बसवण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे शहरातील पाटील गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने पाटपूजा केल्यानंतर शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या स्वागताचा मराठी भाषेतील भव्य फलक उभारला होता.  कन्नड अक्षरे नसल्याचे कारण देत महापालिकेकडून काल शुक्रवारी सायंकाळी तो फलक उतरवण्यात आला. मनपा प्रशासनाच्या कृतीमुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. महापालिकेच्या बाप्पाच्या स्वागताचा फलक हटविण्याच्या कृतीचा मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने देखील तीव्र निषेध केला.

दरम्यान आज मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे अखेर महापालिका प्रशासनाने आज नमते घेत पाटील गल्ली येथील हटवण्यात आलेला फलक पुन्हा पूर्ववत बसवण्यास अनुमती दिली. त्यानुसार गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने बाप्पाच्या स्वागताचा फलक पूर्वत आहे त्या जागी उभारला. याप्रसंगी मध्यवर्ती हे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी आदींसह पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *