बेळगाव : येळ्ळूर विभाग म ए समिती बैठक सोमवारी दि. 28/07/2025 रोजी येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये बेळगांव महानगर पालिकेमध्ये मराठी परिपत्रक मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीन नगरसेवकानी मराठी बाणा दाखविल्याबद्दल नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, या तिन्ही नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच येत्या 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कन्नडसक्ती विरोधात मोर्चा होणार आहे. या मोर्चाला येळ्ळूर विभागकडून जाहीर पाठींबा देण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या सीमा समन्वय समितीने कन्नडसक्ती विरोधात ठोस भूमिका घ्यावीत, असे विचार मांडण्यात आले. या बैठकीला येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी, येळ्ळूर ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष भुजंग पाटील, सचिव राजू उघाडे, उपाध्यक्ष लक्ष्मण छत्र्यानावर, मूर्तीकुमार माने, आनंद पाटील यांनी आपले विचार मांडले, यावेळी येळ्ळूर विभाग म ए समितीचे उपाध्यक्ष मनोहर पाटील, परशराम घाडी, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, तानाजी पाटील, लक्ष्मण मेलगे, गोपाळ शहापूरकर, मनोहर घाडी, निखील पातील, किरण पाटील, रुपेश मेलगे, मल्लापा काकतीकर, सिद्धार्थ पाटील, मारुती यलगुकर,जोतिबा पाटील, अनिल पाटील, तसेच सर्व एकनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta