Saturday , December 13 2025
Breaking News

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; कुडची पूल पाण्याखाली

Spread the love

बेळगाव : महाराष्ट्रातील पश्चिम घाट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे चिक्कोडी उपविभागातील कृष्णा आणि दुधगंगा नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.

सध्या, कृष्णा नदीत १ लाख क्युसेक पाण्याची आवक होत असल्यामुळे महाराष्ट्राशी जोडणारा कुडची-उगार पूल पाण्याखाली गेला आहे. लोकांनी पूल ओलांडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत.

कृष्णा नदीवरील पूल, यड्डूर – कल्लोला, भवनसौंदत्ती – मांजरी, मल्लिकवाड – दत्तवाड, करदगा – भोज, भोजवाडी – करादगा, एकसंबा- दत्तवाड, भारवाड – कुन्नूर, भोजवाडी – कुन्नूर आणि इतर पूल पाण्याखाली गेले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दिवंगत शांताबाई नंदिहळ्ळी यांना शोकसभेत श्रद्धांजली

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात दिवंगत शांताबाई (आक्का) परशुराम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *