Thursday , March 5 2026
Breaking News

महापालिका आयुक्त शुभा बी. यांचा शहरात फेरफटका!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी आज सकाळी अचानकपणे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.
आज त्यांनी शहरात फेरफटका मारत शहरातील गणपत गल्ली येथील नरगुंदकर भावे चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि उपस्थिती तपासली. त्यानंतर, पायोनियर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. त्यांनी महापालिकेच्या शववाहिकेची स्थिती पाहिली आणि नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *