Friday , March 6 2026
Breaking News

आशा कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : आशा कार्यकर्त्यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना राज्याचे आणि केंद्राचे प्रोत्साहन धन मिळून किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मिळावे तसेच या वेतन प्रणालीची अंमलबजावणी एप्रिल महिन्यापासून व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात येत असल्याची माहिती एआययुटीयुसीच्या राज्य सचिव डी. नागलक्ष्मी यांनी दिली. बेळगाव शहरात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. मार्च महिन्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व अंगणवाडी, मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांसाठी तरतूद केल्याप्रमाणे आशा कार्यकर्त्यांना देखील दहा हजार रुपये प्रोत्साहन भर मिळावे तर शहरातील आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी. केंद्र सरकारने जून, जुलै 2025 मध्ये केलेल्या प्रोत्साहन मान धन वाढीची अंमलबजावणी राज्यात देखील करण्यात यावी. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 12 ते 14 ऑगस्टपर्यंत राज्यव्यापी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती डी. नागलक्ष्मी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत गीता रायगोड, रूपा अंगडी, लक्ष्मण जडगन्नवर, रिटा फर्नांडिस, लता जाधव यांच्यासह कर्नाटक राज्य संयुक्त आशा कार्यकर्ता संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *