बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने रविवारी झालेल्या राष्ट्रीय समूहगीत स्पर्धेत हिंदी विभागात लव्ह डेल सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्य अतिथी महापौर मंगेश पवार यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख 5,000 रूपये व प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. त्यांची पुढील महिन्यात रायचूर येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तर लोकगीत स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून ज्योती सेंट्रल स्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
हिंदी विभागात द्वितीय क्रमांक ज्योती सेंट्रल स्कूल आणि तृतीय क्रमांक भरतेश इंग्रजी माध्यम स्कूलने मिळविला. विशेष पारितोषिके ज्ञान प्रबोधन मंदिर व अमृता विद्यालयम् यांना देण्यात आली. त्याचप्रमाणे लोकगीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक एम्. व्ही. हेरवाडकर स्कूल आणि तृतीय क्रमांक अमृता विद्यालयमने मिळविला. संत मीरा हायस्कूल, के. एल्. एस्. स्कूल यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात रजनी गुर्जर यांच्या संपूर्ण वंदे मातरमने झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. प्रा. अरुणा नाईक यांनी मुख्य अतिथिंची ओळख करून दिली. लक्ष्मी तिगडी यांनी यांनी परीक्षकांची ओळख करून दिली. रजनी गुर्जर यांनी स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या. मंजुश्री खोत, मैथिली आपटे व किर्ती सरदेसाई यांनी परिक्षकांचे कार्य पाहिले.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी राष्ट्रभक्ती, देशाप्रती आपली कर्तव्ये आणि सामाजिक बांधिलकी याबाबत आपले विचार मांडले. सायंकाळी पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित महापौर मंगेश पवार यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून परिषदेच्या राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक निस्वार्थ राष्ट्रसेवेची प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखद देशपांडे यांनी केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष व्ही. एन. जोशी, डॉ. वदिंद्र यलबुर्गी, पांडुरंग नायक, डॉ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, रामचंद्र तिगडी, कुमार पाटील, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, अमर देसाई, पी. एम. घाडी, विजय हिडदुग्गी, राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर, जया नायक, पूजा पाटील, स्मिता भुजगुरव, प्रिया पाटील, उमा यलबुर्गी, तृप्ती देसाई, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, ज्योती प्रभू, शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta