बेळगाव : शालेय विद्यार्थी आणि तरुण पिढीला कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी सांबरा येथे आयोजित गाव मर्यादित कुस्त्या उत्साहात पार पडल्या. सुमारे 90 हून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
कुस्ती कमिटीचे सदस्य शितलकुमार तिप्पाण्णाचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या. विजेत्या आणि सहभागी सर्व मल्लांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मैदान यशस्वी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे, मुकुंद मुतगेकर, शिवाजी जत्राटी, इराप्पा जोई, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, भुजंग धर्मोजी, मोहन हरजी, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, शिवाजी मालाई, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, नितीन चिंगळी, महेंद्र गोठे, यल्लाप्पा हरजी, अप्पानी यड्डी, नागेश गिरमल, परशराम लोहार, तिप्पांना हणमाई, प्रवीण ताडे, भुजंग धर्मोजी, परशराम धर्मोजी यांनी परिश्रम घेतले. गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
Check Also
उद्यापासून सार्वजनिक वाचनालयाची बॅ. नाथ पै व्याख्यानमाला
Spread the love बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, या संस्थेच्यावतीने आयोजित …