Monday , September 14 2026
Breaking News

संकेश्वरात आज कडेकोट-कडेलोट नाटक..

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे शनिवार दि. १९ मार्च २०२२ रोजी टायनी टेल्स निर्मित कडेलोट.. कडेकोट नाटक सादर केले जाणार आहे. इटालियन फ्रॅका रामे या लेखिकेने ७० च्या दशकात लिहिलेले हे नाटक अमोल पाटील यांनी अनुवादित केले आहे. दिग्दर्शक कल्पेश समेळ यांचे असून नेपथ्य मयुरेश माळवदे यांचे आहे. कलाकार प्रतिक्षा खासनिस यांनी एका बाईची गोष्ट उत्तम प्रकारे सादर केली आहे. नाटकात स्त्रियांचे व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाखविण्यात आले आहे. महिलांनी आवर्जून पहावे असे नाटक असून रुक्मिणी गार्डन येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता असे दोन प्रयोग सादर केले जाणार असल्याचे नाटक आयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्या पुढे म्हणाल्या नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांच्या हस्ते नाटकाचे उदघाटन होणार असून नाटकाच्या दोन्ही प्रयोगाला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा ४ सप्टेंबरला

Spread the love  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती व भक्तांच्या सहकार्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *