Thursday , March 5 2026
Breaking News

शाहुनगर येथील इटर्निया कंपौंड व्हेंचर्स नामक कंपनीकडून 89 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध तक्रार

Spread the love

 

बेळगाव : ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा देण्याचे सांगून सावजांना ठकवण्याचे सायबर गुन्हेगारांचे प्रकार सुरुच आहेत. बेळगाव येथेही एका कंपनीने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडविल्याचे उघडकीस आले असून यासंबंधी फशी पडलेल्या गुंतवणूकदारांनी मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. सुमारे 89 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
फसवणुकीच्या या प्रकाराने एकच खळबळ माजली असून इतर गुंतवणूकदार हादरुन गेले आहेत. वडगाव येथील सुभाष पुन्नाप्पा चव्हाण व इतर नऊ जणांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एपीएमसी पोलीस स्थानकात चौघा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

फहिक बेग (राहणार ऑटोनगर), शफान नाईक, काझिमअली बेग (दोघेही राहणार वीरभद्रनगर), मलिकजान नाईक (राहणार बेळगाव) या चौघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात गंडविण्यात आल्याचे गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीवरुन उघडकीस आले आहे.
सुभाष चव्हाण यांच्याबरोबरच मुनीर सुंदरगी, नासीर सराफ, संगीता चव्हाण, आयुबखान सौदागर, इनायत मुल्ला, जोतिबा झेंडे, साजिद शेख, सादिक कोतवाल, शाहिद मुल्ला आदींचीही फसवणूक झाली आहे. फसवणुकीची रक्कम 89 लाख रुपयांहून अधिक असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इतर गुंतवणूकदारही हादरले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *