बेळगाव : बेळगाव येथील नेहरू स्टेडियमच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित माध्यमिक मुला-मुलींच्या उंचउडी, खो -खो, कबड्डी, भालाफेक, 4×100 मी. रिले स्पर्धेत डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलच्या स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
माध्यमिक मुलांच्या उंचउडी, 100 मी, 200 मी, 4×100 मी. रिले स्पर्धेत शाळेचा मुस्तफा नाजूकन्नवर हा विजेता तसेच सुमित लकमन्नवर या विद्यार्थ्याने उंचउडी, भालाफेक, 4×100 मी. रिले स्पर्धेत विजेतेपद व 3000 मी, 1500मी, 800 मी, 4×100 रिले या धावण्याच्या स्पर्धेत कुमार विजय दुडूम या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांची तालुका पातळीवर निवड झाली आहे. मुलांच्या खोखो गटातील अंतिम सामन्यात शाळेच्या खो-खो गटांनी विजेतेपद पटकावले व मुलींच्या गटांनी उपविजेतेपद पटकाविले. तसेच कबड्डी गटातील मुलांच्या अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावून दोन्ही गटांची तालुका पातळीवर निवड झाली आहे.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे श्री आर. पी. रामगोंडा, मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले, एम. बी. बखेडी व शारीरिक शिक्षक श्री. पी. वाय. कमाल या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta