Tuesday , September 17 2024
Breaking News

शहापूरात साजरी पर्यावरणपूरक रंगपंचमी

Spread the love

बेळगाव : कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शासनाच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली.रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी माजी नगरसेवक, पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद सुटला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री. मालोजी अष्टेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. नेताजी जाधव यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक नितिन जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी डीसीपी श्री. गडादीसाहेब, एसीपी नारायण बरमणी यांनी प्रत्येकाने आपापले सण शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रदूषणमुक्तरंगपंचमी उपक्रमाचे कौतुक करून प्रतिष्ठानला धन्यवाद दिले. या कार्यक्रमात मान्यवर सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव बिर्जे, एलआयसीचे घाडी साहेब, सतिश गावडोजी, सुधीर कालकुंद्रीकर, प्रभाकर भाकोजी, नगरसेवक रवि साळुंखे, माजी ननगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे, सौ. व श्री. मनोहर हलगेकर, श्रीमती सुधा भातकांडे, श्रीमती वर्षा आजरेकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीधर उर्फ बापू जाधव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *