Wednesday , March 4 2026
Breaking News

भाजपा नेते किरण जाधव यांची सार्वजनिक गणेश मंडळांना भेट!

Spread the love

बेळगाव : भाजपाचे नेते किरण जाधव तसेच इतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडपांना भेट देऊन दर्शन घेतले व पूजेत सहभागी झाले.

या भेटीदरम्यान जाधव यांनी उद्याच्या गणेश विसर्जनासाठी असलेल्या मार्गांचा तसेच तलावांचा आढावा घेतला. पुढे नार्वेकर गल्ली युवक मंडळाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी गणेशोत्सवाच्या भव्यतेचा गौरव केला.

ते म्हणाले, “बेळगाव गणेशोत्सव कोणताही भेदभाव न करता, सर्व समाज घटकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणरायाने बेळगावकरांना सुख, शांती व विकासाची देणगी द्यावी,” अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

अनसूरकर गल्ली श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मारुती गल्ली सार्वजनिक मंडळ आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी अतिथींचे स्वागत केले. या प्रसंगी सार्वजनिक मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *