बेळगाव : बेळगावमध्ये आज एआयडीएसओच्या नेतृत्वाखाली शासकीय पदवी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी राणी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन केले.
राज्यात पदवी महाविद्यालयांचे चालू शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र, सरकारने अतिथी प्राध्यापकांची नियुक्ती न केल्यामुळे शिक्षकांची मोठी कमतरता भासत आहे. परिणामी, नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासकीय पदवी महाविद्यालये पूर्णपणे अतिथी प्राध्यापकांवर अवलंबून आहेत. एका बाजूला युजीसीचे नियम अडथळा ठरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयातील वादामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. जिल्हा समन्वयक महांतेश बिळ्ळूर यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने शिक्षणसंबंधी केंद्र सरकारने घेतलेले निर्णय राज्यासाठी बंधनकारक नाहीत, असे स्पष्ट केले आहे.” या आंदोलनात विविध शासकीय पदवी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta