
बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी ठिक सकाळी 11 वा. शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तीना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई यांनी दिली.
डॉ. संध्या देशपांडे यांना साहित्य भूषण पुरस्कार, ह. भ. प. प्रभाकर सांबरेकर यांना सेवा भूषण पुरस्कार, मेहबूब एम्. मुल्तानी यांना शिक्षक भूषण पुरस्कार, कु. श्रेया भोमाणा पोटे हिला क्रिडा भूषण पुरस्कार, श्री बाळकृष्ण रामचंद्र देसाई यांला उचगाव भूषण पुरस्कार तसेच विविध क्षेत्रात निवड, निवृत्त सभासद, जेष्ठ नागरिक, एस. एस. एल. सी. उचगाव केंद्रात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विध्याथ्यांचा सत्कार, सभासदांच्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्यकर्मी डॉ. संध्या देशपांडे यांना साहित्य भूषण पुरस्कार
मराठीच्या प्राध्यापिका, नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, भूमिका, लेखन कार्य, बालरंगभूमीसाठी नाट्यांकूर संस्थेची स्थापना, अनुवादक, शालेय पाठ्यपुस्तक समितीच्या अध्यक्ष म्हणून ओळख निर्माण केली आहे.
जन्म 26 ऑक्टोबर 1958 इचलकंरजीत झाला. बीए पर्यंतचे शिक्षण इचलकरंजीत झाले. एम ए व पीएच. डी कर्नाटक विद्यापीठातून संपादित केल्या. एमए ला मराठी विषयात त्या विद्यापीठात प्रथम आल्या. जी एस एस व आर पी डी महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या निवृत झाल्या. संत साहित्य, मराठी नाटकं, एकांकिका, प्रबंध, कादंबऱ्या, चरित्र, कथा संग्रह,अनुवाद प्रबोधनकार, विविध अवॉर्ड, पुरस्कार मिळाले आहेत म्हणून त्यांना आमचा सोसायटीच्या वतीने साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ह. भ. प. प्रभाकर सांबरेकर यांना सेवा भूषण पुरस्कार
मूळचे शहापुर बेळगावचे 1979 साली वयाच्या 25व्या वर्षी केबल मन म्हणून रुजू झाले. कामगारांचे हित लक्षात घेऊन कामगारांच्या बाजूने झटणे पंत संस्थेचे 10 वर्ष चेअरमन होते. कामगार युनियनचे सचिव होते. ऑल इंडिया कामगार संघटनेचे सभासद होते हे करत असताना 30 वर्षा पूर्वी सांप्रदायिक वारकरी महा संघाची स्थापना केली. आळंदी ते पंढरपूर पायी वारी दिंडीचे व्यवस्थापन व खजिनदार म्हणून पंचवीस वर्षे पद सांभाळून रोपाचे वृक्ष केले. त्या ठिकाणी 30×90 चा आरसीसी मठ बांधून बेळगाव व ग्रामीण भागातील वारकऱ्यांची सोय केली अशा या सेवाभावी व्यक्तीला आमच्या सोसायटीच्या वतीने सेवा भूषण पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
मेहबूब एम्. मुल्तानी यांना शिक्षक भूषण पुरस्कार
मुळचे चनमा कित्तूरचे बिडी शाळेचे अध्यापक विद्यार्थ्यांना करिअरचे उद्दिष्ट ठेवून मार्गदर्शन देणारे, इंग्रजीचे शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, टीकात्मक विचारसरणी, संवाद, कवी, साहित्यिक योगदान देणे. 50 पेक्षा जास्त वेळा शिक्षकांमध्ये कार्य शाळा घेऊन साहित्याविषयी लक्ष केंद्रित करणे. अभ्यासक्रम, विकास आणि शिक्षण प्रशिक्षणात इंग्रजीचे योगदान, त्यांना प्रजावाणी पुरस्कार मिळाला असून निबंध, कविता व लघु कथा साहित्यिक योगदानात व्यापकपणे ओळखले जाणारे म्हणून त्यांना आमच्या सोसायटीच्या वतीने शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कु. श्रेया भोमाना पोटे हिला क्रिडा भूषण पुरस्कार
सुळगा उचगावची सुकन्या असून वयाचा 9 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरु केली. वयाच्या 11 व्या वर्षी पहिली हुबळी महिला क्रिकेट लीग टोर्नामेंट खेळली. या पहिल्या मॅचमध्ये सामना विरांगना हा पुरस्कार पटकाविला. वयाच्या 14व्या वर्षी अंडर यू 15 कर्नाटका टीम मध्ये 2022-23 व 2023-24 सलग दोन वर्ष खेळली. 2025 मध्ये धारवाड विभाग वरिष्ठ महिला टीम मध्ये खेळली. 2025 मध्ये के पी एल महाराणी ट्रॉफी मैसूर वारीयर टीम व छोट्या-मोठ्या टोर्नामेंटमध्ये सामना विरांगना, बेस्ट बॉलर, बेस्ट बेटर, मालिका विरांगना अशा अनेक मालिकेतून पारितोषिक पटकावले आहे म्हणून त्यांना आमच्या सोसायटीच्या वतीने क्रिडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई यांना उचगाव भूषण पुरस्कार
उचगावचे सुपुत्र, श्री मळेकरणी सोसायटी स्थापने पासून संचालक, अमरज्योत शिक्षण संस्था नोंदणी कार्यात व तिन्ही हायस्कूल स्थापनेत क्रियाशील सहभाग, विविध संस्थांचे पदाधिकारी, उचगाव गावातील प्रत्येक मंदिरांचे जिर्णोध्दार कमिटीचे सदस्य व लेखापाल, 1995 पासून श्री. मळेकरणी देवी समस्त देसाई भाऊबंद ट्रस्ट सचिव, 1980 पासून शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी ता. चंदगड शिक्षकी पेशातून कर्तव्यदक्ष, आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावून निवृत्त झाले ते शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रात, समाजात भावनिक असे सलत मोठे योगदान व मार्गदर्शन करत असतात म्हणून त्यांना आमच्या सोसायटीच्या वतीने उचगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta