बेळगाव : अशोक नगर येथील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्टॅंडर्डच्या 50×25, 10 लेनच्या जलतरण तलावाचे रीतसर उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी साडेअकरा वाजता उतरचे आमदार श्री. असिफ उर्फ राजू शेठ यांच्या हस्ते होणार असून यावेळी बेळगावचे महापौर श्री. मंगेश पवार, उपमहापौर सौ. वाणी जोशी, महापालिका आयुक्त शुभा बी., डेप्युटी कमिशनर लक्ष्मी निपाणीकर, पोलीस अधिकारी डीसीपी नारायण बरमनी, ओलंपियान व अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री. मुकुंद किल्लेकर, कर्नाटक राज्य अथलेटिक असोसिएशनचे सेक्रेटरी श्री. अशोक शिंत्रे, एन आय एस कोच विश्वास पवार, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतुजा पवार, नगरसेवक, अधिकारी, जलतरणपटू, पालक व जलतरणप्रेमी उद्या उपस्थित राहणार आहेत असे आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते हे कळवितात. या समारंभासाठी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन आबा स्पोर्ट्स क्लब तर्फे करण्यात आले आहे.
हा तलाव सुरू करण्यासाठी पत्रकामध्ये टेंडरसाठी जाहीर नोटीस दिली होती आणि हे टेंडर आबा स्पोर्ट्स क्लबला देण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून महानगरपालिकेतर्फे पुलची डागडुजी आणि नूतनकीकरण करण्याचं काम चालू होतं आणि त्याचबरोबर आबा क्लबचे सर्व मेंबर हा तलाव चालू करण्यासाठी विशेष परिश्रम घेत होते आणि अखेर उद्याचा दिवस हा जलतरण तलाव जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta