Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

Spread the love

 

पुणे : बेळगावकरांनी पुणेस्थित बेळगावकरांसाठी स्थापन केलेली बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित स. नं. 77, लक्ष्मीनारायण पार्क, शॉप नंबर 11, ससाणे नगर, हडपसर, पुणे – 28 या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी क्रांतीज्योती महिला प्रतिष्ठान स्व. सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र, नवले ब्रीज जवळ, वडगाव खु. पुणे येथे संपन्न झाली.
सभेला अध्यक्ष श्री. मोहन लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष श्री. परशुराम भरमाणा चौगुले, संचालक श्री. शिवाजीराव जोतिबा पाटील, श्री. गावडू विष्णू पाटील, श्री. नारायण रामचंद्र पाटील, श्री. पांडुरंग बाबुराव कुलम, श्री. दत्ताराम मयानी भेकणे, तसेच संचालिका सौ. स्नेहा पांडुरंग मुचंडी व सौ. गौरी राजेंद्र सुतार तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद सौ. नीलम संजय जगताप व सौ. साक्षी सचिन पाटील व संस्थेचे दैनंदिन प्रतिनिधी श्री. परशुराम गोपाळराव नावगेकर उपस्थित होते.

प्रथम अध्यक्ष श्री. मोहन पाटील यांनी उपस्थित सर्व सभासद व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेमध्ये पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनमार्फत सर्व संचालक आणि सभासदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालिका सौ नीलाक्षी राऊत व ऍड. श्री. महेंद्र खरात यांनी सर्व संचालक व सभासदांना मार्गदर्शन केले. संस्थेस यावर्षी 24,26,925.50 इतका नफा झाला व सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
संस्थेचे लेखापरीक्षक श्री. रामदास सोनाजी शिर्के व संस्थेचे सीए श्री. अरविंद जनार्धन भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सभासद व संचालकांच्या एकत्रित प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *