
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे १७ ते २३ सप्टेंबर २०२५ दरम्यान पाचवा राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवार, दि. २० सप्टेंबर रोजी फार्माकोव्हिजिलन्स या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला.

या सेमिनारला केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, मराठा मंडळ एन्. जी.एच. इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. प्रकाश व्ही. दिवान हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना औषधांच्या सुरक्षिततेबाबत फार्माकोव्हिजिलन्सचे महत्त्व, औषधांच्या दुष्परिणामांची नोंदणी व विश्लेषणाची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, उप प्राचार्य प्रा. डॉ. नागेश सी.. होते. त्याच बरोबर या कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे कोआँर्डीनेटर म्हणून आदित्य पाटील यांनी काम पाहिले.
या सप्तहाचा भाग म्हणून कॉलेजच्या वतीने निबंध स्पर्धा आणि भित्तिचित्रंस्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Belgaum Varta Belgaum Varta