बेळगाव : शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे आज वडे बुद्रुक तुळजापूर (महाराष्ट्र) येथील छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहण्यात आली.
शिवपुत्र छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा वैद्य श्रीशके 1610 म्हणजे दि. 11 मार्च रोजी 1689 वा हौतात्म्य दिन आचरणात आणण्यात आला. तेंव्हापासून एक महिना बलिदान मास पाळला जातो.
या बलिदान मासानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग पदाधिकारी व शिवसैनिकांनी वडे बुद्रुक तुळजापूर (महाराष्ट्र) येथे आज बुधवारी सकाळी भेट देऊन छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले.
प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बेळगाव शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक समाधी समोर नतमस्तक झाले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, प्रवीण तेजम, प्रदीप सुतार, राजकुमार बोकडे, संभाजी पावशे आदी उपस्थित होते.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …