
येळ्ळूर : येळ्ळूर येथील हणमंत गौड नगर येथील नागरिकांनी व पाटील समाजातील जनतेने माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान सदस्य सतीश पाटील यांच्याकडे हणमंत गौड नगर येथील लाईटची समस्या मांडून प्रत्येक्षात निदर्शनाला आणून दिली. या कामांचा पाठपुरवठा ग्राम पंचायतमधील बैठकांमध्ये वारंवार करून अध्यक्ष, पीडिओ व सभागृहा समोर तेथील समस्या मांडून सभागृहाची व सर्व सदस्यांची मान्यता घेऊन खलील कामांचा ठराव पास करून घेतला. थडेदेव समोर हायमास्ट तसेच छ. शिवाजी रोड पासून नारायण दळवी यांच्या घरापर्यंत केईबीचे सिमेंट खांब घालून स्ट्रीट लाईटच्या कामांची मान्यता घेऊन काम सुरु असताना काही आपल्याच पाटील बंधुंनी स्मशानभूमीबरोबर दरवर्षी प्रमाणे यल्लम्माला जाऊन आलेल्या भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अध्यक्ष व पीडिओ यांना सतीश पाटील व पाटील समाजातील नागरिकांनी सूचना करून परत एक हायमास्ट करण्याचे ठरविण्यात आले. यावरील कांमामुळे येथील नागरिकांची समस्या कायमस्वरुपी दुर करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य व पाटील समाजातील नागरिक व गावातील नागरिक उपस्थित होते. या तिन्ही कामांचा पाठपुरावा करून कामांना चालना दिल्यामुळे गावातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta