Wednesday , December 10 2025
Breaking News

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती

Spread the love

 

समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांचा पुढाकार

बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून राज्यात जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी जनगणना फॉर्म भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, उपजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा तपशील नोंदवावा, याबाबत सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी शहर व उपनगरातील श्री दुर्गामाता महिला मंडळांना भेट देऊन महिलांना जनगणना प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी फॉर्म अचूक कसा भरावा, कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी कनका कोकणकर, अश्विनी लाड, प्रियंका जाधव, संजना सातेरी, सुचित्रा सुतार, धनश्री कोरगावकर, रेखा धामणेकर, सुमित्रा कणबर्गी, अश्विनी बेडरे, गंगा पाटील, चंद्रकला परब आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *