Wednesday , March 4 2026
Breaking News

हिंदवाडी महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी आठ वाजता अभिषेक, पूजा, आरती कुमारीका पूजन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच वाजता भजनी मंडळाचे भजन व विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक 22 रोजी घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात झाली असून मंगळवारी सद्गुरु भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम पार पडले. त्यानंतर बुधवारी शारदा भजनी मंडळाच्या भजनाचे सादरीकरण करण्यात आले. तर गुरुवार दि. 25 रोजी हदगा (भोंडला) करण्यात आला. शुक्रवारी 26 रोजी सायंकाळी पाच वाजता स्वरगंध भजनी मंडळाचे भजन व ललितासहस्त्रनाम पार पडले तर शनिवार दि. 27 रोजी सायंकाळी पाच वाजता पाककला स्पर्धा. मुगापासून गोड किंवा तिखट पदार्थ बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. उद्या रविवारी दि. 28 रोजी सायंकाळी पाच वाजता आरतीचे ताट सजून आणण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर सोमवार दि. 29 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दीप पूजन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 30 रोजी दुर्गाष्टमीचे पूजन सकाळी 11 वाजता दुर्गा होम व कुणकुमार्चन होईल व सायंकाळी पाच वाजता दैवज्ञ भजनी मंडळाचे भजन आयोजित करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी खंडेनवमी व सायंकाळी आयोजित स्पर्धांचे बक्षीस समारंभ व त्यानंतर दांडिया आयोजित करण्यात आले आहे तर गुरुवारी विजयादशमी दसरा साजरा करण्यात येईल, अधिक माहितीसाठी हिंदवाडी महिला मंडळाच्या पदाधिकारी सौ. धनश्री सावंत (9448282377), सौ. भारती किल्लेकर (8762189363), श्री. मारुती भट (9731916917) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *