

बेळगाव : समर्थ नगर परिसरात आज सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सदर महिला घरातून बाहेर पडली होती. ती घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी तिची शोधाशोध केली असता विहिरीजवळ चप्पल आढळल्याने स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व एच ई आर एफ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेत मृतदेह बाहेर काढला. या मोहिमेत बसवराज, पद्मप्रसाद हुळी व राजू यांनी सहभाग घेतला. समाजसेवक अवधूत तुडयेकर यांनी बचावकार्याला मदत केली. दुर्दैवी महिलेची ओळख पटली असून तिच्याबाबत अद्याप सविस्तर माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta