

बेळगाव : “कविता हा वाङ्मयातील सर्वात अवघड प्रकार आहे. कविता लिहिणे ही तपस्या आहे. कविता शब्दांमध्ये मांडणे फार कठीण असते, सतत वेगळेपण शोधणे हे कवीचे काम असते. आज येथे अनेक कवींनी आपल्या सुंदर कविता सादर केल्या.”असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित मराठी अभिजात भाषा गौरव सप्ताहात बुधवारी बाग परिवाराच्या सहकार्याने आयोजित मराठी कवी संमेलनात १४ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्याप्रसंगी समारोप करताना डॉ. गायकवाड बोलत होते.
वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी उपस्थित कवींचे स्वागत केले. कार्यवाह सुनीता मोहिते यांनी सर्व कविना गुलाब पुष्प देऊन त्यांचा गौरव केला. या संमेलनात पुढील कवीनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या.
प्रा मनिषा नाडगौडा – मोबाईल च्या जगात हसणं आणि रडण कसं हरवलंय याचे वर्णन करणारी कविता हसणं आणि रडण सादर केली.
अपर्णा अविनाश पाटील- यांनी वटपौर्णिमेचे महत्त्व सांगणारी कविता – वटपोर्णिमा सादर केली.
जोतिबा नागवडेकर- यांनी सध्य परिस्थितीवर भाष्य करणारी कविता “असे का” सादर केली.
प्रतिभा सडेकर – यांनी माझे माय मराठीचे बोल मांडले.
गुरुनाथ किरमटे- यांनी बापाच्या जीवनाची व्यथा मांडणारी कविता “बाप” सादर केली.
अस्मिता आळतेकर – यांनी बेळगावच्या सीमा प्रश्ना संदर्भात विठ्ठलाला आळवणारी कविता सादर केली.
प्रा.शुभदा खानोलकर – यांनी निसर्गाचे वर्णन करणारी कविता निसर्गरम्य सोहळा सादर केली.
स्मिता किल्लेकर – यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी कविता “आक्रोश” सादर केली.
अक्षता येळ्ळुरकर – यांनी आईची थोरवी सांगणारी कविता “आई”
तर स्नेहल बर्डे यांनी अभिजात मराठी भाषेचा गौरव सांगणारी कविता सादर केली.
पुजा सुतार- वाट शोधती ही कविता म्हणून दाखवली.
प्रा. महादेव खोत- माझी माय मराठी लढत आहे ही कविता सादर केली.
मधु पाटील यांनीही मायबोली ही कविता सादर केली.
अशोक सुतार यांनी हुतात्म्याचे जीवन सांगणारी सीमा प्रश्नावरिल दुसरी कविता सादर केली तर चंद्रशेखर गायकवाड यांच्या स्मार्ट सिटी आणि सीमा कवी रवींद्र पाटील यांच्या कविता माझी शब्दांची या कवितानी संमेलनात रंगत आणली.
याप्रसंगी वाचनालयाचे संचालक ईश्वर मुचंडी, अभय याळगी, रघुनाथ बांडगी, लता पाटील व प्रसन्न हेरेकर यांच्यासह कर्मचारी वर्ग आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————–
गुरुवारी समारोप
गुरुवारी सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने शिक्षकांचे संमेलन होणार असून “मराठी भाषेच्या अभिवृद्धीत शिक्षकांचा सहभाग” या विषयावर शामराव पाटील, बसवंत सायनेकर, इराप्पा गुरव, विनायक पाटील व वृषाली कदम हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta