

बेळगाव : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी काडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या उपस्थितीत युवराज कदम यांनी आज काडा कार्यालयात पदभार स्वीकारला.
युवराज कदम यांचा विविध संघटनांनी सत्कार केला. यावेळी कागवाडचे आमदार राजू कागे, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी आणि इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta