बेळगाव (वार्ता) : गुडस् शेड रोड, बेळगाव येथील नर्तकी प्राईड येथे जिव्हाळा फौंडेशनच्यावतीने डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजिण्यात आले होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून भाजप ओबीसी मोर्चाचे कर्नाटक राज्य सचिव किरण जाधव यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, जिव्हाळा फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या सोबत आपल्या कुटुंबीयांचे आरोग्य अबाधित राखण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी डॉक्टर सविता कद्दु, डॉक्टर सुरेखा पोटे, शेखर पाटील, नितिश जैन, किरण शर्मा, अंकित पोरवाल, राकेश साकारिया यासह जिव्हाळा फौंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते. या भागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …