केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी दिले आदेश
बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांनी महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी मनपा आयुक्तांना तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती पण तिथून काहीच प्रतिसाद न भेटल्याने युवा समितीने थेट केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री श्री. मुख्तार अब्बास नक्वी तसेच चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना पत्र पाठवले होते, या अर्जाची दखल घेत चेन्नई येथील दक्षिण व पूर्व विभाग भाषिक अल्पसंख्याक कार्यालय, चेन्नईचे सहाय्यक आयुक्त श्री. एस. शिवकुमार यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहले आहे, की “बेळगावात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे तसेच 2013 मध्ये धारवाड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला चा माहिती घेत, नव्या महानगरपालिका इमारतीवर मराठी फलक लावण्याचे निर्देश दिला आहे या सोबतच घटनेतील कलम 29 नुसार जिथं १५% पेक्षा जास्त प्रमाणात राहणाऱ्या भाषिकांना सर्व कागदपत्रे, विविध प्रकारच्या सरकारी सूचना मराठीमध्ये देण्याची निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहे. तरी याची अंमलबजावणी करून भाषिक अल्पसंख्याक कार्यालयाला आणि युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांना माहिती देण्याची सूचना दिल्या आहेत.