
बेळगावच्या कापड व्यवसायाला सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील: सतिश तेंडोलकर
बेळगाव : बेळगाव क्लोथ मर्चंट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ काल मंगळवारी पार पडला. अध्यक्षपदी सतीश तेंडोलकर, उपाध्यक्षपदी मुकेश सांगवी व राजू पालीवाला, सेक्रेटरी मुकेश खोडा, सह सेक्रेटरी कमलेश खोडा, खजिनदार पदी लालचंद छापरू व सह खजिनदार पदी नितेश जैन यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी काल पदभार स्वीकारला. असोसिएशनचे माजी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी नूतन अध्यक्षांकडे सूत्रे प्रदान केली.
हॉटेल आदर्श पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला क्लोथ मर्चंट पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष सतीश तेंडोलकर म्हणाले, बेळगाव हे कापड साडी सूत आणि हातमाग उद्योगासाठी देशातील एक जुने केंद्र आहे. येथील व्यापाऱ्यांनी मागील अनेक वर्षांपासून सर्वोत्तम व्यवसाय करून बेळगावला कापड बाजार पेठ म्हणून नावलौकिक म्हणून दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यातील नागरिक खरेदीसाठी बेळगाव येथे येत असतात. कापड उद्योगामुळे बेळगाव मधील इतर व्यवसायांना हातभार लागत आहे. बेळगाव शहराचा विचार करता शहराच्या एकूण दरडोई उत्पन्नापैकी 65 टक्के उत्पन्न कापड व्यवसायातून मिळते. शहरातील 70 टक्के होऊन अधिक दुकाने कापड व्यवसायाशी निगडित आहेत. कापड व्यवसायाने बेळगाव मधील 35 टक्क्यांहून अधिक नागरिकांना रोजगार देऊन औद्योगिक क्षेत्राशी बरोबर केलेली आहे. शहरातील काही समस्या दूर करून या व्यवसायाला अजूनही सुसज्ज करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta