
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबर ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळण्याबाबत आणि त्या निमित्त आयोजित सायकल फेरीत सामूहिक सहभाग नोंदविण्याबाबत चर्चा झाली. सर्व सदस्यांनी एकमताने सायकल फेरीत सहभागी होण्याचा ठराव मंजूर केला.
बैठकीत अध्यक्ष विलास घाडी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येळ्ळूर गावाने सीमाप्रश्नासाठी दिलेले योगदान आणि केलेला त्याग अमूल्य आहे. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातील संघर्षातही येळ्ळूरचे योगदान अग्रक्रमी राहिले आहे.”
ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी म्हटले की, “मराठी भाषा, संस्कृती आणि ओळख टिकविण्याची लढाई अजूनही सुरूच आहे. ही ज्योत आपण जिवंत ठेवली पाहिजे.”
माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी युवकांना उद्देशून आवाहन केले की, “मराठीवरील अन्यायाविरोधात युवकांनी एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. ‘काळा दिन’ सायकल फेरीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचा संदेश द्यावा.”
यावेळी नारायण कुंडेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेणसे, जोतिबा (पिंटू) चौगुले, परशराम परीट, मनोहर आ. पाटील, परशराम घाडी, मनोहर सी. पाटील, मधु पाटील, शुभम जाधव, निखिल पाटील, मल्लाप्पा काकतीकर, यल्लाप्पा बिर्जे, किशोर हलगेकर, चेतन हुंदरे, मनोज बेकवाडकर, सिद्धार्थ पाटील, चेतन देवलतकर, गणेश कुगजी, सौरभ कुगजी, गुरु साळुंखे, शुभम टक्केकर आदी समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप मनोहर घाडी यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta