Friday , March 14 2025
Breaking News

लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

बेळगाव (प्रतिनिधी) : लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अपूर्व उत्साहात पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, क्षेत्र शिक्षणाधिकारी रवि बजंत्री, डाॅ. हरप्रित कौर, चेअरमन राज घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे व प्राचार्या लक्ष्मी इंचल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष शाम घाटगे होते. पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन दिवस संमेलनाचे आयोजन दि.२४, २५ व २६ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुश्राव्य सरस्वतीस्तवन व स्वागतगीताने झाली. प्राचार्या लक्ष्मी इंचल यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन खास गौरविण्यात आले. यावेळी बोलताना प्रमुख अतिथींनी शाळेची सर्वांगिण प्रगती व शिस्तबध्द आयोजनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा करून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराती, राजस्थानी, केरळ, पंजाब तसेच पाश्चात्य गीतांवर उत्कृष्ट नृत्ये प्रस्तुत केली. राष्ट्रीय एकात्मता समूहगीत गायनाने उपस्थितांची उत्सुर्त दाद मिळविली. नर्सरी विभागाच्या विशेष कार्निवल कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

Spread the love  बेळगाव : बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *