खानापूर : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजीची गावची कन्या रोहिणी पाटील आगामी काळात होणाऱ्या बेंगलोर येथे खेलो इंडिया साठी ज्युडो या स्पर्धेत भाग घेणार आहे.
नुकत्याच उत्तर प्रदेश कानपूर येथे झालेल्या आंतर महाविद्यालय स्पर्धेत बेळगावच्या रोहिणी पाटील हिने उत्तम रीतीने प्रतिस्पर्ध्याची मात करत चार सामन्यात उत्तम कामगिरी करत आपले वर्चस्व टिकवून ठेवले यामधून तिची आगामी काळात होणाऱ्या खेलो इंडिया साठी निवड झाली.
रोहिणी पाटील ही गर्लगुंजीची खेळाडू असून हिने 2014 पासून ज्युडो या खेळ प्रकारात भाग घेऊन आजपर्यंत राष्ट्रीय स्तरावर एक रौप्य, चार कांस्यपदक पटकाविले आहे तर राज्यस्तरीय स्पर्धात बारा सुवर्णपदकाची आजपर्यंत गवसणी घातली आहे.
रोहिणी हिला जितेंद्रसिंग, त्रिवेणीसिंग यांचे मार्गदर्शन लाभत असून सध्या ज्यूडो कोच रोहिणी पाटील यांच्याकडून जिल्हा क्रीडांगणावर प्रशिक्षण घेत आहे.
खेलो इंडिया ही राष्ट्रीय स्तरावरील मोठी स्पर्धा आहे ज्यात बेळगावच्या अनेक खेळाडूंनी यश मिळवले आहे.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …