
बेळगाव : येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. अधिवेशन काळात वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, भोजन त्याचप्रमाणे संपर्क सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनात उत्तम प्रकारे आयोजन व्हावे यासाठी विविध उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपल्या जबाबदाऱ्यांचे अधिवेशन काळात कोणत्याही त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. सुवर्णसौध येथे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते.
अधिवेशनाच्या तयारीसाठी म्हणून महत्त्वाच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. पोलीस विभागाच्या समन्वयाने अधिकारी कर्मचारी आणि मार्शल यांच्यासाठी प्रवेश पासचे वाटप करावे त्याचप्रमाणे सुवर्णसंधीच्या तळमजल्यावर स्वतंत्र भोजन व्यवस्था आणि कॅन्टीन सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे निश्चित केलेल्या आंदोलनस्थळांवर वैद्यकीय सेवा स्वच्छता सुविधा त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी असे निर्देश देखील यावेळी त्यांनी दिले. हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित असणाऱ्या मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाजवळ वैद्यकीय पथक त्याचप्रमाणे रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनांची तांत्रिक तपासणी करून गेल्या संदर्भात सूचना देखील देण्यात आल्या असून अधिवेशन दरम्यान फोन व इंटरनेट सेवा खंडित होणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले आहेत.
नागरिकांसाठी पास वाटप करत असताना आवश्यक ओळखपत्रे कसून तपासण्यात यावी व सुवर्ण विधानसौध परिसरात येणाऱ्या वाहनांची नीट तपासणी करण्यात यावी असे निर्देश पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिले आहेत. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएएस अभिनव जैन, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह वाहतूक निवास भोजन सुरक्षा यासंदर्भातील सर्व उप समित्यांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta