
बेळगाव : कॅपिटल वन तर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सलग 17 व्या वर्षी अयोजीत करण्यात आलेल्या एस्. एस्. एल्. सी. व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा सोहळा रविवार दि. १६/११/२०२५ रोजी ज्योती महाविद्यालय, कॅम्प, बेळगाव, येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील यांनी दहावीच्या विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी समुपदेशनाची (counseling) नितांत गरज असल्याचे सांगत संस्थेच्या उपक्रमाची प्रशंशा केली.

यावेळी संचालक शरद पाटील, मराठी विषयाचे व्याख्याते श्री. सी. वाय. पाटील व बी. एम. पाटील, मागील वर्षाचा यशवंत विद्यार्थी कु. आशुतोष देसुरकर व संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे हे उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच विद्यार्थ्याना व्याख्यानमालेचे महत्व व या उपक्रमाबद्दल संस्थेचा उद्धेश याची माहिती दिली ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी निर्भीडपणे परिक्षेला सामोरे जावे, जीवनाला कलाटणी देणारी ही परीक्षा असून आपण यात पूर्णपणे झोकून देऊन आपल्या जीवनातील यशस्वी मार्गाची सुरुवात करावी.
सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक, पालकवर्ग व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सी. वाय. पाटील यांनी केले तर शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उदघाटनाच्या कार्यक्रमाची सांगता करून व्याख्यानमालेस सुरुवात करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta