
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे युवासेना बेळगाव या संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या वर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवराय व बाळासाहेब यांचे पूजन करून शिबिराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी तमाम मराठी भाषिक, युवक, शिवसैनिक यांनी उपस्थित राहून व रक्तदान करून बाळासाहेबांना अभिवादन केले.

विशेषतः या कार्यक्रमात युवकांची संख्या उल्लेखनीय होती. या वेळी युवासेना बेळगावचे प्रमुख विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, वैभव कामत, मल्हार पावशे, महेश मजुकर, गौरांग गेंजी, ओमकार बैलूरकर, अमेश देसाई, प्रणव बेळगावकर, श्वेत तवनशेट्टी, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश बडसकर, सक्षम कंग्राळकर इत्यादी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta