
बेळगाव : बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे होते. ते लिंगायत होते, असे वादग्रस्त वक्तव्य कन्नड साहित्यिक वाय.आर. पाटील यांनी केले आहे.
कर्नाटक राज्य विकास संघटनेने आज बेळगावातील कन्नड भवन येथे विद्यार्थी प्रतिभा पुरस्कार आणि कन्नड राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा पालक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोली यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.साहित्यक वाय.आर. पाटील प्रमुख पाहुणे होते. आमदार आसिफ सेठ, भीमराव पवार, हुबळीचे पोलिस निरीक्षक डॉ. ज्योतिर्लिंग होनकट्टीत्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष नेत्रेकर होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक वाय. आर. पाटील म्हणाले की, कन्नड ही अशी भाषा आहे जी इतर सर्व भाषांना मागे टाकून वाढली आहे. ब्रिटिश काळातही कन्नडला महत्त्व देण्यात आले. बेळगावमध्ये कन्नड आणि मराठी भाषांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे होते. ते लिंगायत होते आणि त्यांचे कुलदैवत श्रीशैल मल्लिकार्जुन होते.यावरुन कन्नड आणि मराठीचे नाते किती मजबूत आहे याचा हा पुरावा आहे असे ही पाटील यांनी सांगितले.
यापूर्वीही छत्रपती शिवरायांवरून कर्नाटकातील नेत्यांनी खळबळ जनक दावे केले होते त्यात आता साहित्य पाटील यांनी भर घातली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta