

बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीससह शहापूर व एपीएमसी पोलिसांनी काल मंगळवारी छापे टाकून सहा विविध गुन्ह्यांमध्ये दहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक ड्रॅगन चाकू आणि ओसी मटक्याच्या चिठ्ठ्या तसेच 11,400 रुपये रोख रक्कम जप्त केल्या आहेत.


पोलीसांनी काल मंगळवारी केलेल्या कारवाईत मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत मोडका बाजार शेजारी सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून मटका खेळणाऱ्यांकडून रोख रक्कम 4,450 रुपये व मटक्याचे चिठ्ठ्या जप्त करत मटका खेळणाऱ्या तीन जणांना अटक केली. मार्केट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शशी कुमार कुरळे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस पथकाने ही धाड टाकून मटका खेळणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे प्रशांत व्यंकटेश रेवणकर (61 राहणार विष्णू गल्ली वडगाव), जहीर अब्बास मोहम्मद रफीक शेख (वय 47, जालगार गल्ली बेळगाव), आणि फहीम जिलानी कोतवाल (रा. खंजर गल्ली बेळगाव), अशी आहेत. तर दुसऱ्या घटनेतील शहरातील जुन्या भाजी मार्केट शेजारी सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणाऱ्या तिघांना मार्केट पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नावर आणि त्यांच्या पथकाने धाड टाकून अटक केली आहे. यावेळी त्यांच्याकडे रोख 3,200 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुनील दोंडबा सदावर (वय 51, रा. कामत गल्ली बेळगाव), शमशेर अल्लाबक्ष पिरजादे (वय 35, रा. चौथा क्रॉस अमननगर बेळगाव) आणि गजानन शशिकांत गरडे (रा. कामत गल्ली बेळगाव) अशी आहेत. तर तिसऱ्या प्रकरणात अँटिस्ट्रबिंग पथकाने ड्रॅगन चाकू सारखे घातक शस्त्र घेऊन रस्त्यावर वावरणाऱ्या एका संशयिताला मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक विठ्ठल हवन्नावर आणि त्यांच्या पथकाने अटक केली आहे. ऑंटी स्टॉपिंग पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव विनायक शंकर प्रधान (वय 50, राहणार महाद्वार रोड तिसरा क्रॉस बेळगाव), असे असून समर्थ नगर नाल्या शेजारी रस्त्यावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या विनायकची झडती घेतली असता भीम पथकाला त्याच्याकडे हिरव्या मुठीचा प्राण घातक ड्रॅगन चाकू सापडला असून वरील तिन्ही गुन्ह्यांसाठी मार्केट पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे नोंद झाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. चौथ्या प्रकरणात बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड गेट शेजारी ओसी मटका अड्डा चालवणाऱ्या एका मटका बुकिला एपीएमसी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. आर. मुतती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून रंगेहात अटक केली आहे यावेळी मटका बुकि जवळील रोख सातशे रुपये आणि मटक्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपींची नावे विजेशकुमार मादर (वय 36 रा. रामनगर, चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द बेळगाव), याला एपीएमसी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. जी. होनवाड आणि त्यांच्या पथकाने अटक केली असून त्याच्या जवळील 800 रुपये रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून सहाव्या प्रकरणी वडगाव कलमेश्वर रोड श्री गणपती देवस्थान येथे मटक्याचा अड्डा चालवणाऱ्या एका इसमास शहापूर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक एस. एन. बसाप्पा यांनी ताब्यात घेतले असून त्याच्याजवळील 2250 रुपये आणि मटक्याचे चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नावे किशन मल्लाप्पा पाटील (वय 50 रा. तहसीलदार गल्ली बेळगाव), असे असून याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या सर्व प्रकारणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta